कामाठीपुऱ्यातील महिलांनी बांधली डॉ. लहानेंना राखी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी शनिवारी डॉ. तात्याराव लहाने यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

'सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन' अर्थात 'साई' ही संस्था देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन आणि उत्कर्षासाठी कार्य करते. समाजानेच तयार केलेला आणि वंचित ठेवलेला हा घटक. या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'साई' संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.

यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन देखील केले जाते. यापैकी एक उपक्रम म्हणजे ‘रक्षाबंधन’. समाजातील प्रतिष्ठित आणि प्रभावशील व्यक्तीला या दिवशी बंधू म्हणून निमंत्रित केले जाते. या वंचित भगिनी आपल्या या बंधूचे औक्षण करुन त्यांना राखी बांधतात. १९९१ पासून हा उपक्रम 'साई' संस्था राबवित आहे.

यंदाच्या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी ‘बंधू’ होण्याचा मान प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना मिळाला. शनिवारी दुपारी ११ वी गल्ली, कामाठीपुरा येथे या वंचित महिलांनी डॉ. लहाने यांना राख्या बांधल्या.

यावेळी मराठी सिने-नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम देखील उपस्थित होते. त्यांना देखील साई संस्थेच्या महिलांनी राख्या बांधल्या. यावेळी 'साई' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनय वस्त उपस्थित होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या