मुंबईत पाणीसाठा घटत असताना आणि कमी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) पाण्याचे नियोजन करण्यासाठी कपात लागू केली आहे. दरम्यान, अनेक नगरसेवकांनी आगामी सभेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करणारा प्रस्ताव मांडला आहे.
5 मेपर्यंत मुंबईच्या सात तलावांमध्ये 3.71 लाख दशलक्ष लिटर (25.66%) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 3.28 लाख ML (22.66%) तर 2024 मध्ये 2.53 लाख ML (17.54%) होता.
दररोज 4,100 ML पाणीपुरवठा होत असल्याने सध्याचा साठा साधारण 90 दिवस पुरेल, मात्र परिस्थिती अजूनही धोक्याची आहे.
रीता मखवाना (Rita Makwana) यांनी सांगितले की, मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या रीडेव्हलपमेंटमुळे (redevelopment) भूजल पातळी घटत आहे. पाइलिंग, ड्रिलिंग, उत्खनन आणि डिवॉटरिंगमुळे विहिरी आटत आहेत.
त्यामुळे त्यांनी पुढील उपाय सुचवले:
विकासापूर्वी अनिवार्य सर्वेक्षण
Hydrogeological अहवाल
Dewatering वर नियंत्रण
Rainwater harvesting आणि विहिरींचे पुनर्भरण बंधनकारक करणे
वर्षा टेंबवलेकर (Varsha Tembvalkar) यांनी जुन्या आणि नव्या पाइपलाइनमध्ये अॅडवान्स इनफेक्शन (advanced inspection) कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे गळती आणि दूषित पाणी तात्काळ ओळखता येईल. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, जवळपास 34% पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते.
प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी तलावांमधील गाळ 5 ते 10 वर्षांतून एकदा काढण्याची मागणी केली आहे, जेणेकरून साठवण क्षमता वाढेल.
सहिदा खान (Saeeda Khan) यांनी कोकणातील पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रकल्प राबवण्याची मागणी केली आहे. यामुळे शहरासाठी “water bank” तयार होईल आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी होईल.
एल निनो El Nino मुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि पावसात तूट राहू शकते. यामुळे BMC ने 15 मेपासून 10% पाणी कपात जाहीर केली आहे, जेणेकरून ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येईल.
मात्र, नगरसेवकांचे मत आहे की केवळ कपात पुरेशी नाही, तर दीर्घकालीन नियोजन आणि ठोस उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यातील पाणी संकट आणखी गंभीर होऊ शकते.
हेही वाचा