पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील काही दिवस अधूनमधून हजेरी लावणारा पाऊस नवरात्रोत्सवात पुन्हा सक्रिय होणार आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात पुढील आठवडाभर वादळी वाऱयासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत सोमवारी ताशी 30 ते 40 किमी वेगाच्या वादळी वा ऱयासह पाऊस पडेल. तसेच घाटमाथ्यावरील जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने हवामान खात्याने विविध जिह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानुसार सोमवारी मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादिवशी शहरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर कोकण, मुंबई आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टी भागात 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. 3 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. ऐन नवरात्रीत पावसाचा जोर वाढणार असल्याने गरबा रसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. 

राज्यात मागील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर आता वादळी वाऱयासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धुमशान घालणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आला आहे.    

उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती

उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱयालगत सोमवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्याच्या प्रभावामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत तसेच दक्षिण उत्तर प्रदेशापासून मराठवाडय़ापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. याचा परिणाम होऊन राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.


हेही वाचा

ठाणे: 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत जड वाहनांना बंदी

ओला, उबेर, रॅपिडो मुंबईतील टॅक्सीप्रमाणे भाडे आकारणार

पुढील बातमी
इतर बातम्या