आमच्या त्रासाचं काय?

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - ओला आणि उबरचे चालक आपल्या मागण्यांसाठी गेले काही दिवस संपावर होते. घटत जाणारे उत्पन्न, कंपन्यांकडून आकारले जाणारे वाढीव शुल्क, प्रोत्साहन रकमेत करण्यात आलेली कपात या पार्श्वभूमीवर ओला आणि उबर चालकांकडून हा संप पुकारण्यात आला होता. या संपाच्या दरम्यान मुंबईकरांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले ते 'मुंबई बोले तो' मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही नागरिकांना ओला उबरच्या संपाचा त्रास झाला तर काहिंनी टॅक्सीचा पर्याय असल्यामुळे तेवढा काही त्रास जाणवला नाही अशी प्रतिक्रिया दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या