मुंबईकरांचे पाणी महागले, 'या' महिन्यापासून पाणीपट्टीत वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत रखडलेली पाणी दरवाढ अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलात आणली आहे.

सन २०२२-२३मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे.

मुंबई महापालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने याबाबत प्रशासनाला अधिकार दिले आहेत. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जात आहे.

आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी तसेच धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च या सर्वाची गोळाबेरीज करून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव तयार केला जातो.

अशी आहे दरवाढ (प्रतिहजार लिटर)

  • झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे : ४.७६ पैसे
  • झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती ५.२८ पैसे
  • व्यावसायिक ग्राहकांसाठी ४७.७५ पैसे
  • बिगर व्यापारी संस्था २५.४६ पैसे
  • उद्योगधंदे, कारखाने ६३ ६५ पैसे
  • रेसकोर्स, तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल ९५.४९ पैसे
  • बाटलीबंद पाणी कंपन्या १३२.६४ पैसे
पुढील बातमी
इतर बातम्या