देशभरातील अनेक शहरांमध्ये यावेळी तीव्र उष्मा जाणवत आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर आहे. दरम्यान, हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सूनचे भारतात नियोजित वेळेच्या काही दिवस आधी आगमन होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजाला पुष्टी देत मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे.
उष्णतेची लाट आणि मान्सून आणि हवामानाच्या अंदाजाबाबत, IMD मुंबईचे प्रमुख सुनील जी कांबळे म्हणतात, 'मुंबईत, 34-35 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान हे उन्हाळ्याच्या हंगामासाठी सामान्य तापमान असते, परंतु शहरातील आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असते.
'मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे, तो केरळमध्ये 31 मे रोजी पोहोचेल आणि यंदा मुंबईत 10-11 जून रोजी मान्सून अपेक्षित आहे.' दक्षिण महाराष्ट्रात 5 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा