JVLR जंक्शनवर महापालिका प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवणार

Representational Image
Representational Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमुळे श्वसनाशी संबंधित आजाराही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे भाजपचे माजी नगरसेवक पंकज यादव यांच्या सूचनेची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने दखल घेतली आहे. 

या अनुषंगाने पालकमंत्री ऍड. मंगलप्रभात लोढा यांनी जोगेश्वरीतील जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण यंत्रे बसविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. 

हवामान बदलाचा मुंबई प्रदेशासह मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जोगेश्वरी पूर्व, मेट्रो उड्डाणपुलावर नवीन विकास कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे जेव्हीएलआर जंक्शन परिसरात प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी नगरसेवक पंकज यादव यांनी ऑगस्ट महिन्यात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले होते.

यामध्ये जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण यंत्र बसविण्याची मागणीही करण्यात आली. मुंबईत लावण्यात येणाऱ्या पाच प्रदूषण नियंत्रण यंत्रांपैकी एक मशीन जेव्हीएलआर जंक्शनवर बसविण्याचे निर्देश पालकमंत्री अ‍ॅडव्होकेट मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.


हेही वाचा

15 डिसेंबरपर्यंत मुंबईत 250 आपला दवाखाना केंद्रे सुरू होणार

अवघ्या 10 मिनिटांत फुफ्फुसाच्या कर्करोगाचे होणार निदान

पुढील बातमी
इतर बातम्या