पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचं काय?

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - उरणमध्ये पाच सशस्त्र संशयित तरूण घुसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नाकानाक्यावर पोलिसांकडून तपासणी केली जात असून महत्त्वाच्या अतिसंवेदनशील परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंत्रालय, विधानभवन, दुतावास कार्यालये, पालिका मुख्यालय, महत्त्वाची सरकारी कार्यालये येथील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. पालिका मुख्यालय हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताबरोबरच पालिकेची अंतर्गत सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्याची मागणी शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महासभेत केली. येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यासह त्यांच्याकडील सामानाचीही तपासणी करण्यासंबंधीचे आदेश सुरक्षा यंत्रणेला देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या