वसई विरार शहरातील महापालिका परिवहन सेवा ठप्प

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई-विरार (virar) परिसरातील महानगरपालिका वाहतूक सेवा मंगळवारी सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिवहन (bus) कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारल्याने महापालिकेची एकही बस रस्त्यावर दिसली नाही.

पगारवाढीच्या निर्णयाला उशीर झाल्याने आणि चालू पगार वेळेवर न मिळाल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाची माहिती महापालिकेला (vvmc) देण्यात आली नाही याबद्दल प्रशासन आश्चर्य व्यक्त करत आहे.

या संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शाळकरी मुलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. खाजगी वाहने आणि रिक्षांवर अवलंबून राहिल्याने प्रवाशांना सकाळपासूनच आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.

कर्मचाऱ्यांच्या मते, पगारवाढीच्या मागणीवर प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही आणि चालू पगार वेळेवर दिला जात नाही.

या नाराजीमुळे त्यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेला या संपाची कोणतीही पूर्वसूचना नसल्याने प्रशासनही तयारीशिवाय पेचात पडले आहे.

अचानक झालेल्या या बंदमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे आणि हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.


हेही वाचा

बेस्ट बसची कारला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू

पालिकेच्या मालमत्ता चित्रपट-ओटीटी शूटिंगसाठी वापरल्या जाणार

पुढील बातमी
इतर बातम्या