हा नाला की कचरापेटी?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर - पालिकेकडून वेळेवर नाल्याची सफाई होत नसल्याने चेंबूरमधील कोकणनगर चरई नाला हा कचरापेटीच बनलाय. त्यामुळे या नाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चेंबूरच्या साठेनगर, कोकणनगर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून हा चरई नाला वाहतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. सध्या हा नाला पूर्णपणे कचऱ्याने भरला आहे. त्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय याठिकाणी साथीच्या आजारांनी देखील रहिवासी हैराण झाले आहेत.पालिका केवळ पावसाळ्यापूर्वीच याठिकाणी नालेसफाई करते. मात्र सध्या हा नाला पूर्णपणे तुंबलेला असल्याने पालिकेने याठिकाणी सफाई करावी यासाठी अनेकदा पालिकेकडे तक्रारी दिल्याची माहिती स्थानिक रहिवासी विशाल मोहिते यांनी दिली आहे. मात्र पालिका याठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने पालिकेने तात्काळ याठिकाणी सफाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. 

चरई नाल्याची पहाणी केली जाईल. त्यामध्ये पाहणी केल्यानंतर येत्या दोन दिवसांत साफसफाईच्या कामाला सुरुवात होईल

 - संदीप कांबळे, उपअभियंता, नाले सफाई विभाग

पुढील बातमी
इतर बातम्या