लवाटे दाम्पत्याला हवंय इच्छामरण, राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अापण देवाकडे नेहमी सुखी अाणि अानंदी जीवनासाठी प्रार्थना करत असतो. पण गिरगावात राहणाऱ्या लवाटे दाम्पत्यानं देवाकडे नव्हे तर देशाच्या प्रथम नागरिकाकडे वेगळीच मागणी केली अाहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून नारायण अाणि इरावती या लवाटे दाम्पत्याने इच्छामरणाची मागणी केली अाहे.

इच्छामरणासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा

नारायण लवाटे हे सध्या ८६ वर्षांचे तर इरावती ह्या ७९ वर्षांच्या अाहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी इच्छामरणाची मागणी लावून धरली आहे. इच्छामरण द्यावं, अशा आशयाचं पत्र लवाटे दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं आहे. ते गेली ३० वर्ष इच्छामरणाचा कायदा व्हावा, म्हणून ते पाठपुरावा करत आहेत. पण, त्यांना याबाबत काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आता त्यांनी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे. 

एकत्र मृत्यूसाठी इच्छामरण हवं

लवाटे दाम्पत्यांला मूलबाळ नाही. अनेक वर्षे ते एकमेकांना सुखदुःखात साथ देत जगले. पण अाता सोबत मृत्यू मिळावा म्हणून, आम्ही इच्छामरणाची मागणी केली आहे, असं या दोघांनी म्हटलं आहे. अामच्या अवयदानाद्वारे जर कुणाला जीवनदान मिळालं, तर ती अामच्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. म्हणूनच अाम्ही अवयवदान करण्यासाठी इच्छामरणाची मागणी करत अाहोत, असं इरावती लवाटे यांनी सांगितलं.

लवाटे कुटुंबियाची पार्श्वभूमी

नारायण लवाटे हे एसटी महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आता दोघेही गिरगावातील ठाकूरद्वार भागात असलेल्या चाळीत राहतात. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ दिली, आता मृत्यूदेखील सोबत यावा, हीच इच्छा या दोघांनीही व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या