या उपक्रमाचा उद्देश प्रकल्पग्रस्त युवकांना उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन विमान वाहतूक आणि विमानतळ सेवा क्षेत्रातील उदयोन्मुख रोजगार संधींसाठी तयार करणे हा आहे. हे प्रशिक्षण MSSDSशी संलग्न असलेल्या व्हिप्रा स्किल इंडिया प्रा. लि. या संस्थेमार्फत दिले जाणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Service Executive), एअरलाईन बॅगेज हँडलर, विमानतळ टर्मिनल ऑपरेशन्स मॅनेजर, विमानतळ कार्गो ऑपरेशन्स तसेच एअरलाईन ग्राउंड स्टाफ अशा महत्त्वाच्या विमानतळ-संबंधित पदांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सर्व पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार असून प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि संबंधित विमान वाहतूक सेवांमध्ये भविष्यातील मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी स्थानिक कुशल कर्मचारी तयार करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
इच्छुक प्रकल्पग्रस्त व्यक्तींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी व्हिप्रा स्किल इंडिया प्रा. लि., प्लॉट क्रमांक 12, रोड क्रमांक 2, सेक्टर-1, न्यू पनवेल पूर्व, पनवेल, नवी मुंबई – 410206 येथे संपर्क साधावा. तसेच 7021752324 या क्रमांकावर किंवा mssdscidco@gmail.com या ई-मेलद्वारे माहिती मिळवता येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यापूर्वी स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने सिडकोचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा