नवी मुंबईत ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) नुसार त्यांनी ५०% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. हा आकडा जवळपास ५.४ लाखांच्या घरात आहे. या नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.

या व्यतिरिक्त ९७% पेक्षा जास्त नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. ही टक्केवारी मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक मानली जातेय. याव्यतिरिक्त, NMMC च्या कार्यक्षेत्रात १६ लाखांपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत.

या व्यतिरिक्त, इथं नवरात्रोत्सव असल्यानं, नवी मुंबईतील पंडाळांमध्ये यंदा वाढ झाली आहे. गरबा आणि दांडियाला परवानगी नसताना, हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, शहरात ८६ पंडल लावण्यात आले आहेत जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत.

अहवालात आणखी स्पष्ट करण्यात आलं आहे की, एनएमएमसीला ९१ अर्ज मिळाले. ज्यापैकी५ नाकारले गेले आणि मंजूर झालेल्यांची संख्या ८६ होती.

याव्यतिरिक्त, ठाणे महानगरपालिकेनं (टीएमसी) नवरात्रीसाठी शहरातील ९१ पंडलना परवानगी दिली आहे. जवळजवळ २१४ पंडल गेल्या काही दिवसांमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाईन मार्गांनी परवानगीची विनंती करत आहेत. टीएमसीनं असंही निर्देश दिले आहेत की, बहुतांश पंडळांच्या कार्यक्रमात जागरूकता कार्यक्रम आणि रक्तदान मोहिमेचा समावेश आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या