नवी मुंबईत लंडन, न्यूयॉर्कसारखे देशातील पहिलं एन्टरटेनमेन्ट अरेना

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईत उभारला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारणीसाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांकरिता खुली होणार आहे.

कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी असलेली सिडकोची कटिबद्धता अधोरेखित होत आहे असं या निमित्ताने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं. 

न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्व्केअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या बहुउद्देशीय नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात येत आहे. 

देशातील करमणूक पायाभूत सुविधांमध्ये नवीन मानदंड प्रस्थापित करणार आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतमय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव (immersive productions) घेता येणार आहे.  

आयोजनाकरिता 20,000 प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि 25,000 उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे. 

उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित हितसंबधींसोबत (Stakeholders) भागीदारी करून जागतिक दर्जाचे ज्ञान आणि परिचालन क्षमता आणून देशातील करमणूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे.

हा उपक्रम केवळ अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, पर्यटनाला चालना, नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होणार आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या