पावसाळ्यात मुंबईत झाडे पडण्याच्या घटना सुरुच अाहे. रविवारी संध्याकाळी मेट्रो सिनेमाजवळील एम.जी. रोडवरील झाडाची फांदी पडून एकाचा जागीच मृत्यू झाला. बारसिंग (६०) असं या मृताचे नाव अाहे. तर या घटनेत ४ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर अाहे.
जीटी रुग्णालयात दाखल
एम.जी. रोडवरील होम गार्डच्या कार्यालयाशेजारी असलेले झाड रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कोसळून ही दुघर्टना झाली. या झाडाखाली असलेले पाच जण जखमी झाले. त्यांना त्वरीत जीटी रुग्णालयात दाखल केले असता प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव यांनी यातील एक मृत असल्याचे घोषित केले. तर ६० वर्षीय जेष्ट नागरिक गंभीर जखमी झाला असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात अाले आहे. संतोष सिंग (२८) , रामविलास सोनी (५५) अाणि सलीमउद्दीन शेख (५५) या तिघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
एम. जी. रोडचे रुंदीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात अाले होते. यापूर्वी दहिसरमध्ये झाड पडून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. तर दादरमध्ये झाड पडून २० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती.
हेही वाचा -
प्लास्टिक बंदी : रविवारी ५९२ किलो प्लास्टिक जप्त