बँकेच्या समोरच खड्डा

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसर - एसव्ही रोडच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या समोर खड्डा पडल्याचं पाहायला मिळतंय. 15 दिवसांपासून हा खड्डा पडलाय तरी देखील याच्या दुरुस्तीसाठी कुणालाचं जाग येत नसल्याचं पाहायला मिळतंय. बँक मॅनेजरला याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे रांगेत उभे राहणारे लोक या खड्ड्यात पडल्याचे प्रकारही घडलेत तरी देखील दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय.

पुढील बातमी
इतर बातम्या