पुन्हा चक्रीवादळ; अरबी समुद्राकडे टाँकटाइ वादळ धडकण्याचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गतवर्षी कोरोनानं ग्रासलेल्या राज्यातील नागरिकांना निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला. अनेकांची घर उध्वस्त झाली. अशातच यावर्षी देखील चक्रीवादळाचं महाराष्ट्रावर संकट असल्याची माहिती समोर येत आहे. अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे.

अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. त्या चक्रीवादळाला म्यानमारने टाँकटाइ असं नाव दिलं आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.

म्यानमारकडून वादळाची आगेकूच सुरु असून पुढील काही दिवसांमध्ये अरबी समुद्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि कर्नाटकमध्ये देखील पाऊस होण्याचा अदांज आहे. टाँकटाई या वादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं. निसर्ग चक्रीवादळानंतर मोठ्या स्वरुपातील टाँकटाई हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या