CSMT जवळ ग्लास डोम उभारण्यात येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाचा परिसर आणखी दिमाखदार होणार आहे. पुरातन वारसा स्थळ असलेला या परिसरात पालिकेच्या प्रयत्नातून पुनर्विकास केला जाणार आहे.

महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या महानगरपालिका क्रीडा भवन इथे विविध वैशिष्ट्यांनी नटलेली 'टाऊनहॉल जिमखाना' वास्तू उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेला देखील सुरुवात करण्यात आलीये.

मुंबईकर आणि पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून महत्त्वाचा निर्णय झाला आहे. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या पालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी ‘टाऊनहॉल जिमखाना' इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम), व्हिविंग गॅलरी असणार आहे. गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट देखील असतील. तर छतावर रूफ टॉप कॅफटेरियाही होणार आहे.


हेही वाचा

वांद्रे येथे 50 मीटर उंचीचा व्ह्यूइंग डेक टॉवर बांधला जाणार

आता एकाच तिकिटावर मुंबई लोकल ट्रेन, मेट्रो आणि बेस्ट बसचा प्रवास

पुढील बातमी
इतर बातम्या