Nisarg cyclone : अलिबागमधून 12 हजार नागरिकांचे केलं स्थलांतर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
काही दिवसांपूर्वी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अम्फन नावाच्या चक्रिवादळानं धुडगूस घातला. आता आणखीन एक चक्रिवादळ (Cyclone) महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे, या चक्रिवादळाची तीव्रता लक्षात घेता, रायगड, उरण, अलिबाग परिसरातून आतापर्यंत 12 हजार नागरिकांचे स्थलांतर केलं आहे. हे वादळ मुंबईपासून 150 तर अलिबागपासूूून 95 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती अलिबाग पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अरबी समुद्रात आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झालं आहे. निसर्ग असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या क्षेत्रातील वातावरण पुढील 24 तासात बिघडण्याची चिन्ह आहे. यातून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या आप्तकालीन परिस्थितीत  नागरिकांना वाचवण्यात NDRF च्या पथकाने मोठी भूमिका बजावली होती.  त्याच पार्श्वभूमिवर मुंबईसह कोकण किनार पट्टीत आता NDRF ची 9 पथक तैनात करण्यात आली होती.  माञ वादळाची वेग मर्यादा लक्षात घेऊन प्रशासनाने महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्हयांमध्ये NDRF च्या 45 तुकड्या तैनात केलेल्या आहेत. महाराष्ट्रातून 21 तुकड्यांचा समावेश आहे. त्यातील 5 या विशाखापट्टणम येथून विशेष विमानाने मंगळवारी राञी बोलवल्या आहेत. या 20 तुकड्यांमध्ये 2 टिम पालघर, 2 ठाणे, 3 मुंबई, 4 रायगड, 1 रत्नागिरी, 1 सिंधूदुर्ग, 1 नवीमुंबईत तैनाक केलेल्या आहेत.

तर गुजरात राज्याला ही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्यामुळे त्या ठिकाणी 18 पथकं पाठवण्यात आलेली आहे. तर दिव-दमण येथे 2 पथक तैनात करण्यात आलेली आहे. हे चक्रीवादळ अलिबाग येथे दुपारी 1 च्या सुमारास धडकणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्या पाश्वभूमिवर अलिबाग, उरण,  परिसरातील 12 हजार नागरिकांना शाळा, सभामंडपात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर अलिबाग समुद्र किनाऱ्याला लागूण असलेल्या 6 तटरक्षक ठिकाणी तब्बल 800 पोलिस तैनात केले आहेत. तर रिकामी केलेल्या गावात पोलिसांचे 10 कर्मचारी गस्तीवर आहेत. मुंबईतील वरळी, जुहू, सायन, माहिम, शिवडी, चेंबूर कोळीवाड्यात ही मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या