आधारकार्ड शिवाय सबसिडी नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - जर तुम्ही गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेत असाल आणि आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसाल तर तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागेल. आता 1 डिसेंबरनंतर आधारकार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.

जर तुम्हाला गॅसची सबसिडी पाहिजे असेल तर आधार नंबर देणं जरुरीचं आहे. नाहीतर तुम्ही कायमच्या सबसिडीला मुकणार आहात. गॅस वितरकांकडे आधारकार्ड नंबर देण्याचं केंद्र सरकारनं कळवलं. मात्र, अद्याप त्याकडे लक्ष दिलेलं नाही. नोटबंदीनंतर सरकार आता गॅस सिलेंडर अनुदानावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी नियम कडक करणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या