एमएमआरडीएचं सुपरमार्केट बांधायचं स्वप्न भंगलं

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात सुपरमार्केट सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला कंत्राटदारच मिळत नसल्याचं चित्र आहे. बीकेसीत राहणाऱ्यांसाठी आसपास कुठलंच मार्केट उपलब्ध नाही. त्यामुळे एमएमआरडीएनं स्वतंत्र इमारत उभारत सुपरमार्केटचा घाट घातला. पण आता या सुपरमार्केटला कंत्राटदारांकडून ठेंगा दाखवला जातोय. यापूर्वी एमएमआरडीएनं तीनदा निविदा काढल्या होत्या. पण एकही कंत्राटदार पुढे आला नाही. पण एमएमआरडीएनं सुपरमार्केट सुरू करायचंच असं ठरवून चौथ्यांदा निविदा काढल्या. मात्र चौथ्यांदाही कंत्राटदारांनी पाठ फिरवल्यानं सुपरमार्केटचं एमएमआरडीएचं स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे.

कंत्राटदारांकडून निविदेला मुदतवाढ हवी होती. मात्र तांत्रिक कारणानं ही मुदतवाढ निश्चित वेळेत देता आली नाही. त्यामुळे निविदा उघडण्यातच आली नाही, असं एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. तर पाचव्यांदा यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या