मुंबईत खासगी वाहनांतून फिरताना मास्कची सक्ती नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईमध्ये खासगी वाहनांतून मास्कविना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुखपट्टीचा वापर बंधनकारकच आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण घटत असल्याने खासगी वाहनांमध्ये मास्क वापरण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात येत होती. याबाबत विचार करून खासगी वाहनांमधून मास्कविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘क्लिन अप मार्शल’ना दिले आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक केला होता. मास्कविना फिरणाऱ्यांनी  २०० रुपये दंड करण्यात येत आहे.  सार्वजनिक ठिकाणे, बाजार, मंडया आदी ठिकाणी कारवाई करण्यासाठी पालिकेने पथके तैनात केली आहेत. पालिका कर्मचारी, क्लिन अप मार्शल यांचा पथकांमध्ये समावेश आहे.

सार्वजनिक, तसेच खासगी वाहनांमधून फिरणाऱ्यांनाही मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, खासगी वाहनांमधून फिरणाऱ्या मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये अंतर राखले जात असून मास्कची गरज काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. यावरून पालिकेची पथके आणि प्रवासी यांच्यामध्ये खटके उडत होते.


हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे


पुढील बातमी
इतर बातम्या