पालिकेच्या 1916 दुरध्वनी क्रमांकाला आठ तासांचा ब्रेक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या आपातकालीन व्यवस्थापन कक्षातील 1916 या विशेष दुरध्वनी क्रमांकाची सेवा गुरूवारी आठ तासांसाठी बंद राहणार आहे. गुरूवारी संध्याकाळी 6 ते 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या दरम्यान नागरिकांना 022-22694725/27 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. पालिका मुख्यालयात तळमजल्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे. आता हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर मोठ्या जागेत हलवण्यात येत आहे. या कामासाठीच तब्बल 15 वर्ष आणि 9 महिन्यांनतर पहिल्यांदाच 1916 हा विशेष दुरध्वनी क्रमांक आठ तासांसाठी विश्रांती घेणार आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ल्यासह इमारत पडण्याच्या, आगीच्या दुर्घटना, पुर परिस्थिती अशा सर्वच परिस्थितीत हा क्रमांकाने मुंबईकरांना आधार देत परिस्थिती सक्षमपणे हाताळली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या