पुन्हा झाला एटीएममध्ये खडखडाट!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईमधील एटीएममध्ये पुन्हा खडखडाट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील अनेक एटीएममध्ये पैसेच नसल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. ऐन पगाराच्या काळात एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. 

गेल्या 3-4 दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नाहीयेत. अनेक ठिकाणच्या एटीएम मशीन बाहेर 'नो मनी' असे फलक दिसत आहेत. काहींनी तर मार्च एंडिंगचे कारण देत पैसे भरता आले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नोटबंदीनंतर आता पुन्हा एकदा नागरिकांनी चलन तुटवड्याच्या समस्येने ग्रासले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या