अग्निशमन दलाच्या जवानांची सुटका नाहीच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - अडकलेल्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची सुटका करणे, पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करणे आणि रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे आपात्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांना जावे लागते. कित्येक वेळा अशा प्रकारची कामे करताना जवानांचा मृत्यूही ओढवतो. याच पार्श्वभूमीवर 2015 मध्ये सत्यशोधक समितीने मुंबई महापालिकेला अहवाल दिला होता. या अहवालामध्ये 30 शिफारशी देण्यात आल्या होत्या. त्यातील एक शिफारस होती की अशा प्रसंगी अग्निशमन दल न बोलावता संबंधित विभागाने कारवाई करावी. मात्र, अशा सरकारी विभागांकडे पर्याप्त व्यवस्था नसल्याने अशी कामे अग्निशमन दलाकडेच द्यावी लागणार असल्याचे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्यशोधक समितीच्या शिफारशींनंतरही अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून कामे करावीच लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या