लक्ष द्या! नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महापालिकेने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची, देखभाल दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे हाती घेतली आहेत.

त्यानुसार भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा बुधवार, 7 जून 2023 रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत 12 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बुधवारी 12 तास बंद राहणार आहे.

तसेच, गुरुवार 8 जून 2023 रोजी शहरात सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यानुसार या कालावधीत नागरिकांनी पाण्याचे जतन व जपून वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, नवी मुंबई महानगरपालिका यांनी केले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या