दादरमध्ये जलवाहिनी फुटली, एफ दक्षिण- एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. यामुळे आज ( 8 जुलै रोजी) मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात सकाळी पाणीपुरवठा बंद करण्यात आला, अशी माहिती पालिकेने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पाणी पुरवठा बंद राहिल्याने एफ / उत्तर विभागातील दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी आणि हिंदू कॉलनीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तर  एफ/दक्षिण विभागात  दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ,  काळाचौकी आणि शिवडी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, बीएमसी कर्मचाऱ्यांकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या