महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठा योजनेचा भाग असलेल्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात महत्त्वाचे देखभालीचे काम नियोजित आहे.
परिणामी, गुरुवार, 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागात 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या बंद कालावधीत, संपूर्ण दिवा, मुंब्रा (प्रभाग 26 आणि 31चा काही भाग वगळता), संपूर्ण कळवा वॉर्ड समिती परिसर, वर्तक नगर परिसरातील खालील भागात पाणीपुरवठा होणार नाही. रूपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरूनगर आणि मानपाडा वॉर्ड: कोलशेत खालसा गाव (खालचे गाव) इथे पाणीपुरवठा होणार नाही.
पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर, 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. ठाणे महानगरपालिकेने (टीएमसी) सर्व नागरिकांना या काळात पाणी जपून वापरण्याची आणि सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा