इमान फिरतेय व्हिलचेअरवरून

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सैफी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून उपचार घेत असलेली इमान अहमद आता व्हिलचेअरवर बसून रुग्णालयात फेरफटका मारत आहे. इजिप्तच्या इमान हिचे वजन शस्त्रक्रियेनंतर 500 किलोवरून 250 किलो एवढे झाले आहे. स्लिव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया, इतर उपचार, थेरपी आणि विशेष आहार अशी उपचारपद्धती केल्यानतंर इमान अाता हसूबोलू लागली आहे.

यानंतर पुढच्या टप्प्यात तिचे आणखी 50 किलो वजन कमी होणार आहे. इजिप्तहून 11 फेब्रुवारीला मुंबईत दाखल झालेल्या इमानचे वजन कमी करण्यासाठीचे उपचार 60 टक्के पूर्ण झाले आहेत. या प्रक्रियेत औषधं आणि फिजिओथेरपीमुळे वजनात घट झाल्याचीही माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. भविष्यात इमानला चालण्यासाठी अडथळे येतील. गेली 25 वर्षे इमान अंथरुणाला खिळलेली आहे. वयाच्या 11 व्या वर्षी तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. इमानचा थायरॉइडचा आजार आता नियंत्रित परिस्थितीत असल्याचे रुग्णालयाने सांगितले. सध्या ती पाठ टेकून बसू शकते. इमान तीन दिवसांपासून रुग्णालयात फेरफटका मारत लवकरच इजिप्तला रवाना होणार असल्याचे सैफी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या