मुंबईकरांचा आवडता वडापाव महागण्याची शक्यता, 'हे' आहे कारण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसारख्या धावत्या शहरात वडापाव अनेकांची पोटाची भूक भागवतो. अवघ्या काही रुपयांमध्ये मिळणाऱ्या वडापावाने आतापर्यंत प्रत्येकाला आपलंस केलंय. पण आता हाच वडापाव महागण्याची शक्यता आहे. 

पावाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वडापाव महाग होण्याची शक्यता आहे. यंदा तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वडापावचे दर वाढू शकतात. सर्वसामान्यांची वडापावला मोठी मागणी असते. 

अन्न-धान्यापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचा फटका आता पावाला देखील बसला असून, पावाच्या किमती पुन्हा एकदा पन्नास पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. 

वडापावच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास महागाईचा (Inflation) आणखी एक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. 

पावाच्या दरात पन्नास पैशांची वाढ करण्यात आली आहे. केवळ पावाचेच दर वाढले नाहीत  तर ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. ब्रेडचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे आता पाव आणि ब्रेडपासून तयार होणाऱ्या इतर पदार्थ्यांच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या