महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला (MSSU) रतन टाटा (Ratan TaTa) यांचे नाव देण्यात येणार आहे. आता हे विद्यापीठ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, 14 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. या बैठकित महाराष्ट्र मंत्रिमंडळाने टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावावर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (MSSU) असे नाव देण्यास हिरवी झेंडी दिली.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर लगेचच, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रतन टाटा यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची विनंती करण्याचा प्रस्तावही मंजूर केला.

MSSU, जे मुंबई येथे स्थित आहे, 2022 मध्ये स्थापन करण्यात आले. हे पहिले सरकारी कौशल्य विद्यापीठ आहे जे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेसाठी प्रशिक्षणासह अनेक कौशल्याभिमुख अभ्यासक्रम प्रदान करते. 

रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये निधन झाले.

याशिवाय, महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगितले की, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (टीएटीआर) मोहर्ली येथे उद्घाटन करण्यात आलेल्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटरला दिग्गज उद्योगपती रतन टाटांचे नाव देण्यात येईल. चंद्रपुरात टाटांचे स्मारकही बांधले जाईल, असेही ते म्हणाले.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या