मालाड ते दहिसर दरम्यान घटतेय कोरोना रूग्णांची संख्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने झाला. वरळी, धारावीतील कोरोना नियंत्रणात येत असताना पश्चिम उपनगरात कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाण वाढलं होते. मात्र आता या भागांमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे.  गेल्या काही दिवसांत मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागातील कोरोना रूग्णांच्या  संख्येत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. यामधील बोरिवलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमधील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने या ठिकाणी कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली. कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी डोर टू डोर स्क्रीनिंग आणि स्मार्ट हेल्मेट स्क्रीनिंग देखील पालिकेने सुरू केले आहे.

मालाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०६ दिवसांवर गेला आहे, तर कांदिवलीमध्ये ७२ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट होत आहे. दहिसरमध्ये ७३ दिवसात आणि बोरिवलीमध्ये ५१ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. 


हेही वाचा

अरे बापरे ! राज्यात तासात ३९० जणांचा कोरोनाने मृत्यू, १२ हजार २४८ नवे रुग्ण

मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या