नोटाबंदीमुळे मासे विक्रेत्यांवर आर्थिकसंकट

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ससून डॉक - नोटांच्या चणचणीमुळे ग्राहकांनी मासेखरेदीसाठी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मासे विक्री करणाऱ्या कोळीणींसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. ग्राहकाला उधारीवर मासे देणे किंवा तो तयार असल्यास शिल्लक पैसे नंतर देणे या बोलीवर सध्या कोळींना मासेविक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे मासळी बाजारावर परिणाम झाला असून मासळी बाजारातील गर्दी कमी झाली आहे. अनेकजण हाती असलेले सुट्टे पैसे जपून वापरत आहेत.

आठवड्याभरात मासळी विक्रीच्या व्यवसायाची उलाढाल निम्यावर आल्याची भीतीही काही मंडळी व्यक्त करून लागली आहे. मासळी खराब झाल्यामुळे होणारे नुकसान आम्हाला कोण भरून देणार असा सवाल ससून डॉकमधील मासे विक्रेत्या करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या