ओला, उबर चालक-मालकांचा संप सुरूच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक-मालकांनी मंगळवारपासून पुकारलेला संप गुरुवारीही सुरूच आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. या संपामुळे प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करावा लागत आहे.

अ‍ॅप बेस टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला आणि उबरच्या चालक मालकांकडूनी भाडेवाढीच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून संप पुकारला आहे. प्रति किलोमीटरमागे भाडे वाढवण्याच्या मागणीसाठी सोमवारी उबरच्या कुर्ला येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. मात्र तोडगा न निघाल्याने मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय आहेत मागण्या?

  • ऑनलाइन टॅक्सीचं किमान भाडे १०० ते १५० रुपये असावं

  • प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावं

  • कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावं

या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह बैठक पार पडली. यासंदर्भाचं निवेदन परिवहन मंत्री रावते यांना दिलं होतं. मात्र निवेदनानंतरही काहीच कारवाई होत नसल्यानं चालक मालक संघटनांनी गुरुवारी देखील संप सुरूच ठेवला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या