पाकिस्तान वि. अफगाणिस्तान मॅचवर बेटिंग प्रकरणी एकाला अटक

आशिया चॅम्पियन स्पर्धेतील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सामान्यावर बेटिंग लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मोहित सत्यप्राश बेहल असं आरोपीचं नाव आहे. खेल या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून हा सट्टा लावला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याचे दोन साथीदार नेहल मेहता आणि अमुल देसाई यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

सांताक्रूझ येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये आशिया चॅम्पियन स्पर्धेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सामन्यांवर काही जण सट्टा खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.

या माहितीनंतर पोलिसांनी डिनेको ज्योत सोसायटीच्या ५०१ क्रमांकाच्या रुमवर कारवाई करत नेहल आणि अमुल या दोघांना अटक करत, त्यांच्याजवळून लॅपटाॅप, दहा मोबाइल, आणि सट्टा लावण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य हस्तगत केलं.

आणि आरोपीला अटक

 नेहलच्या चौकशीतून बेहलचं नाव पुढे आल्यानंतर बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेहलला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या