Exclusive: पालिकेच्या प्रयत्नानंतरही हिंदमाता उड्डाणपूलाखालील 'त्या' रुग्णाचा मृत्यू

  • सूरज सावंत & नितेश दूबे
  • सिविक

मुंबईच्या परळ परिसरात के.ई.एम, वाडिया आणि टाटा कँन्सर रुग्णालयात उपचारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. मुंबईत रहाण्याची कुठलाही व्यवस्था नसल्यामुळे अनेक जणांनी हिंदमाता येथील उड्डाणपूलाखाली आसरा घेतला होता. माञ कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता स्थानिक शिवसेना नगरसेविका उर्मिला उल्हास पांचाळ यांनी महापौरांच्या मदतीने या ठिकाणच्या 50 ते 60 रुग्णांना अंधेरीच्या एका पंचतारांकीत हाँटेलमध्ये हलवले. माञ त्या ठिकाणाहून हाँटेलमध्ये न जाणाऱ्या एका कँन्सरबाधित रुग्णाचा आज दुपारी दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

देशात सध्या कोरोना संसर्गाचे थैमान वाढत असताना, राज्यात मुंबईत या रुग्णाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिका, पोलिस आणि आरोग्य प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळेच राज्यभरात संचारबंदी ही लागू केलेली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये,  पाच पेक्षाजास्त व्यक्तींनी एका ठिकाणी उभे राहू नये. असे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जाते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. मुंबई महानगर पालिकेच्या सर्वच रुग्णालयांवर अतिरिक्त ताण पडला आहे. मुंबईत ज्या रुग्णाची राहण्याची व्यवस्था नसते असे बहुतांश रुग्ण व त्यांचे नातेवाईक परळच्या हिंदमाता उड्डाणखाली आसरा घेतात.

या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब स्थानिक शिवसेना नगरसेविका उर्मिला उल्हास पांचाळ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या लक्षात आणून दिल्यीनंतर महापौरांनी घटनास्थळी रविवारी भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या सर्व रुग्णांची व्यवस्था ही अंधेरीपूर्व येथील कँपिटल इंटरनँशनल हाँटेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. माञ त्यावेळी कँन्सरने पीडित रुग्ण त्या ठिकाणी जाण्यास नकार देत होता. त्याच्यासोबत ही कुणी नातेवाईक नव्हते. पोलिस, पालिकाकर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. माञ तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. अखेर कँन्सरच्या ठेवटच्या टप्यात असलेल्या या रुग्णाचा सोमवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला.  माञ सध्याची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणची पाहणी करून मी संबधित धोका लक्षात आणून दिला होता असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पिडीत रुग्णाला वारंवार विनंती करून ही तो येण्यास तयार नव्हता. त्याचे नातेवाईंक किंवा कुटुंबिय ही त्या ठिकाणी नव्हते. अखेर इतर रुग्णांना पंचताराकिंत हाँटेलमध्ये हलवण्यात आले. तर पालिका कर्मचाऱ्यांना सांगून त्या कँन्सर पिडीत रुग्णाच्या नातेवाईकाचा शोध लागेपर्यंत त्याची योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले होते. माञ आज दुपारी त्याचा मृत्यू झाल्याचे कळाले.

उर्मिला उल्हास पांचाळ,

शिवसेना नगरसेविका

 

पुढील बातमी
इतर बातम्या