ठाणे (thane) तालुक्यातील अडवली-भूताली, दहिसर, पिंपरी, वालीवली, भंडार्ली, गोटेघर, मोकाशी, उत्तरशिव, नागाव, नावळी, निघु, नारीवली, बामाळी, वाकळण व बाळे ही 14 गावे पूर्वी नवी मुंबई (navi mumbai) मनपा क्षेत्रात होती.
स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे ही गावे (village) मनपातून वेगळी करण्यात आली. मात्र काही वर्षांपूर्वी पुन्हा हट्टाने त्यांचा समावेश करण्यात आला होता.
कोविड काळात आमचा निधी पळवला. पाणीही पळवले. आम्ही पाणी वापरत नसताना बारवी धरणग्रस्तांना मनपात नोकऱ्या दिल्या; मात्र दहा-बारा वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय दिला नाही.
एमआयडीसीमध्ये (MIDC) नवी मुंबईच्या तोडीचे शहर नाही, मात्र शहराविषयी आस्था नसलेले लोक त्याचे नुकसान करीत आहेत, अशी टीका सुरज पाटील यांनी केली आहे.
तुम्हाला नवी मुंबईविषयी काहीही आत्मियता नाही. सिडकोने (cidco) वसवलेले हे शहर आम्ही जपले, मोठे केले. पुनर्विकासाला विरोध नाही; पण तो नियोजनबद्ध व्हावा, ही आमची ठाम भूमिका आहे.
जनता दरबार हे जनतेच्या प्रश्नांचे व्यासपीठ असूनही तुम्ही त्याच्या विरोधात न्यायालयात जाता. हा विकास रोखण्याचा प्रयत्न आहे. असे माजी नगरसेविका नेत्रा शिर्के म्हणाले आहेत.
मलनिस्सारण केंद्राची जमीन हडपण्यात आली. यादव नगरला शाळेसाठी चार भूखंड देण्यात आले; मात्र त्यातील दोन शाळेच्या पटांगणावर लॉजिंग उभारण्यात आले. हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात घडले.
हेही वाचा