महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील उद्योग, ऊर्जा, खाणकाम आणि कामगार विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने बुधवारी 2.56 लाख कोटी रुपयांच्या 18 प्रकल्पांसाठी विशेष प्रोत्साहनांना मंजुरी दिली.

महाराष्ट्रातील (maharashtra) या प्रकल्पांमुळे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार (jobs) निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे सरकारने म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतरांचा समावेश असलेल्या उपसमितीने, सोलर सेल्स, मॉड्यूल्स, इंगॉट्स, वेफर्स, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण उपकरणे, लिथियम-आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे भाग, स्टील आणि गॅस-टू-केमिकल्स उत्पादन यांसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांतील मेगा आणि अल्ट्रा-मेगा प्रकल्पांसाठी प्रोत्साहनांना मंजुरी दिली.

प्रकल्पाच्या तपशिलानुसार, सर्वात मोठी गुंतवणूक रायगडमध्ये एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लिमिटेडकडून 56,852 कोटी रुपयांची होणार आहे.

तसेच त्यामुळे 25,000 रोजगार निर्माण होतील. रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्रीज गडचिरोलीमध्ये 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 20,000 रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत.

नाशिकसह इतर शहरात व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 500 रोजगार निर्माण करणार.

अमरावतीमध्ये, टेंबो डिफेन्स प्रॉडक्ट्स 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, तर निडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1,000 रोजगार निर्माण करण्याची योजना आखत आहे.

जाबिल सर्किट इंडिया पुण्यातील शिरूरमध्ये 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 3,000 रोजगार उपलब्ध करून देणार.

गडचिरोलीमध्ये, हरिओम पाईप इंडस्ट्रीज 8,000 रोजगार निर्माण करण्यासाठी 3,135 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.

निबे स्पेस अहिल्यानगरमध्ये 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1,000 रोजगार निर्माण करणार आहे.

तर युरोबस इंडिया पुण्यातील तळेगावमध्ये 4,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 12,000 रोजगार निर्माण करण्यात येणार.

याव्यतिरिक्त, मिलियन स्टील चंद्रपूरमध्ये 360 रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 256.01 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार.


हेही वाचा

मुख्यमंत्र्यांचे पाणी जपून वापरण्याचे निर्देश

बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतात प्रथमच जपानच्या 'या' ट्रॅक प्रणालीचा वापर

पुढील बातमी
इतर बातम्या