येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची (brihanmumbai municipal corporation) संपूर्ण यंत्रणा (security) सज्ज झाली आहे.
निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी-अधिकारी, 4,500 स्वयंसेवकांची तसेच 22 हजार पोलीस (mumbai police) नियुक्ती करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीसाठी (BMC Elections 2026) 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात 1700 उमेदवार आहेत.
निवडणुकीची संपूर्ण तयारी पालिकेकडून पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर लागणारी यंत्रणा, सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
80 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या 64 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी सुमारे 4500 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक मतदानाच्या दिवशी मतदार रांगा लावणे, गर्दी व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आदी जबाबदारी असणार आहे.
तसेच प्रत्येक प्रभागात महिलांकडून व्यवस्थापित केलेले किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असेल. अशा केंद्रांमध्ये पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील.
मतदान केंद्रावर मतदाराने शक्यतो, मोबाईल न्यायचा नाही, मात्र नेलाच तर तो स्वीच ऑफ करावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने 22 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शकरीतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, मतदारांसाठी प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हिलचेअर, मानक मतदान कक्ष, आवश्यक दिशादर्शक फलक आदी. दिव्य़ांग मतदार, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेश देताना प्राधान्य देण्यात येणार आहे.
मुंबई भागातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी - निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल या महानगरपालिकेतील मतदारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा