पालिकेची दोन वाहतळं टेंडरच्या प्रतिक्षेत

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव (पू.) - पालिकेने उमिय्यानगर इथे दोन वाहनतळ बांधली खरी पण चार महिने झाले तरी अजूनही ते वापरात नाहीत. पालिकेच्या मते त्या वाहनतळाचे टेंडर अजून कुणीही न घेतल्याने वाहनचालकांना त्याचा लाभ घेता येत नाही.

गोरेगाव पूर्वेच्या उमिय्यानगर येथे 2 तळमजली आणि 4 मजली वाहनतळ इमारत बांधली आहे. त्याच प्रमाणे गोरेगावच्या वेस्टर्न एक्सप्रेस हाय - वे हब मॉल शेजारी 3 तळमजली आणि 3 मजली वाहनतळ बांधले आहे. याचंही काम पूर्ण झाले अाहे. मात्र या सुसज्ज वाहनतळाचा फायदा वाहनचालकांना घेता येत नाही. याबाबत पालिका परीक्षक विभागातील अभियंता अमित साटम यांना विचारले असता, टेंडरची किंमत जास्त आहे, कुणीही हे टेंडर खरेदी करण्यास तयार नसल्याने वाहनतळ बांधूनही त्याचा वापर जनतेला करता येत नसल्याने ते बंद आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या