रुग्ण, डॉक्टरांचे सरकारविरोधात आंदोलन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुर्ला - मुंबईसह राज्यभरात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणी विरोधात आंदोलने झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक अनोखे आंदोलन कुर्ल्यात पाहायला मिळाले. आम आदमी पार्टी तर्फे डॉक्टर आणि रुग्णांनी रविवार 6 वाजता एकत्र येत सरकारच्या विरोधात मोर्चा काढला.

आम आदमी पार्टीचे कुर्ला कमानी येथील मोहल्ला क्लिनिक ते फिनिक्स मॉल आणि तिथून कुर्ला बस डेपो असा हा मोर्चा काढण्यात आला होता. 

यात मोहल्ला क्लिनिक चालवणारे तसंच इतर डॉक्टर आणि अनेक रुग्ण देखील सहभागी झाले होते. डॉक्टरांना मारू नका रुग्णालयांची स्थिती सुधारा , डॉक्टर आणि रुग्णांची परेशानी , सरकारच्या नियतमध्ये आहे बेईमानी, असे सरकारवर टीका करणारे फलक घेऊन रुग्ण आणि डॉक्टरांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या