पेंग्विन दर्शनासाठी वातावरण अनुकूलतेची प्रतीक्षा

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा - वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीबागेत पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण अजूनही पेंग्विन ठेवण्यात येणाऱ्या इमारतीतील वातावरण पेंग्विनसाठी अनुकूल नसल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. तर 26 कोटी खर्च करून पेंग्विन ठेवण्यात येणाऱ्या इमारतीची पाहणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली.

यापूर्वीही मुंबईकरांना 15 नोव्हेंबरला पेंग्विन पाहण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक त्रिपाठी यांनी दिली होती. पण येत्या 15 ते 20 दिवसात तरी त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार पेंग्विन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतील का? याबाबत अजूनही साशंकता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या