'सातही पेंग्विन उत्तम अवस्थेत'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - पेंग्विन मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि लोकायुक्त कार्यालयानं घेतल्यानं आता हे प्रकरण पालिका प्रशासनाच्या चांगलेच अंगलट येणार असल्याची चर्चा आहे. गुरूवारी लोकायुक्त कार्यालयाने राणीबाग उद्यानाचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स पाठवत शुक्रवारी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकायुक्तांच्या या कार्यवाहीनंतर काही वेळातच त्रिपाठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राणीबागेतील सर्व सातही हम्बोल्ट पेंग्विन उत्तम अवस्थेत असल्याचे स्पष्ट केले आहे. सातही पेंग्विन उत्तम आहार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पेंग्विन मृत्यूप्रकरणी, राणीबागेतील असुविधांमुळे पेंग्विन दगावल्याच्या आरोपाबाबत मात्र प्रशासन चुप्पी साधून आहे. त्यामुळे आता लोकायुक्तांच्या सुनावणीत काय होते, त्रिपाठी यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिले जाते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या