मुंबईकर घेतात सर्वात कमी सुट्ट्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कधीही न थांबणारं शहर अशी मुंबईची ओळख. रात्र असो वा दिवस हे शहर नेमहीच घडाळ्याच्या काट्यावर चालतं. इथे काम करणारे लोक कामात इतके व्यस्त असतात की त्यांना ऑफिसमधून सुट्टी काढून आपल्या कुटुंबियांसोबत फिरण्यासही वेळ नसतो, हे एका सर्व्हेतून सिद्ध झालं आहे. ट्रॅव्हल पोर्टल एक्सपीडियाने हा सर्वे केला आहे.

51 टक्के लोक सुट्टीवर गेलेच नाही

ट्रॅव्हल पोर्टल एक्सपीडियाने केलेल्या सर्वेनुसार मुंबईतील 51 टक्के लोक ऑफिसमधून सुट्टीच घेत नाहीत. कारण ते ऑफिसच्या कामात इतके व्यग्र असतात की त्यांना दुसरं काही करायला वेळच मिळत नाही. तर 40 टक्के लोकांना फक्त पैसा कमवण्यात रस असतो म्हणून ते सुट्टीच घेत नाहीत.

जगभराच्या तुलनेत मुंबईतील 27 टक्के लोकांनी गेल्या वर्षी सुट्टीच घेतली नाही. तर 44 टक्के लोक असे आहेत ज्यांनी मागच्या वर्षी 10 दिवसांपेक्षाही कमी सुट्ट्या घेतल्या. मुंबईनंतर कमी सुट्ट्या घेणाऱ्यांच्या यादीत दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो.

या ट्रॅव्हल पोर्टलने केलेल्या सर्व्हेनुसार जवळपास 92 टक्के लोक मानसिक आरोग्य आणि आरोग्याच्या इतर समस्यांच्या बाबतीत सुट्ट्या घेतात.

पुढील बातमी
इतर बातम्या