मुंबईत पेट्रोलने गाठली नव्वदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला. सोमवारी पेट्रोल ११ तर डिझेल ५ पैशांनी महागले. त्यामळे मुंबईत पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली. आता लवकरच हे दर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

अशी झाली दरवाढ

सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर ९०.०८ रुपये तर डिझेलचे दर ७८ रुपये ६५ पैसे प्रति लिटर झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधनवाढ सुरु आहे. परिणामी मुंबईसह राज्यात पेट्रोल आणि डिझेल महागल्याने विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहे.

सामान्य हैराण

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या जनतेचे आणखी हाल होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ रोखण्यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाय-योजना करावी, अशी मागणी वाहनधार आणि सामान्य जनतेकडून केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या