मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पेट्रोल आणि डिझेलचे दर २ दिवसांच्या विरामानंतर सोमवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

पेट्रोलच्या दरात दररोज होणारी वाढ ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या मुंबईत पेट्रोलचे दर ११५ रुपये झाले. या वाढत्या दरामुळे महिन्याच्या आर्थिक खर्च कसा भागवायचा असा सवाल सर्वसामान्यांना सतावत आहे.

इंधन दरात सलग चौथ्या दिवशी रविवारी ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दराने ११५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत पेट्रोल दर ११५.१५ रुपये असून, डिझेलदर १०६.२३ रुपये आहे.

दिल्लीत पेट्रोलसाठी १०९.३४ रुपये, तर डिझेलसाठी ९८.०७ रुपये मोजावे लागत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला.

पुढील बातमी
इतर बातम्या