कचऱ्यामुळे रहिवासी त्रस्त, पालिकेचं दुर्लक्ष

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मालाड - कचरा आणि सांडपाण्यामुळे मालाड पश्चिमेकडील मढच्या शिवाजीनगरमध्ये दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढलाय. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. मात्र पी उत्तर पालिकेच्या घनकचरा विभागानं त्याकडे दुर्लक्ष केलंय. 15 दिवसांपासून या परिसरात कचरा उचलण्यासाठी घनकचरा विभागाचे कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. जमलेला कचरा परिसरातील छोट्या नाल्यात फेकला जात असल्यामुळे नाल्यातलं पाणी रहिवाशांच्या घराबाहेर साचलंय. याबाबत पी उत्तर पालिका विभागाकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवासी संतोष कोळी यांनी केलाय. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्यास पी उत्तर पालिका विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय.

याबाबत पी उत्तर पालिकेच्या घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रकाश गायकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या