मुंबई पोलिसांचा 'भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिरा'चा अनोखा उपक्रम

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • सिविक

उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण याच्या जोरावर शहरातील गरीब आणि मध्यम वर्गातील युवक दरवर्षी पोलिस भरतीत आपलं नशीब आजमवतात. या मुलांना पाठबळ देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक आगळा-वेगळा उपक्रम सुरू केला आहे.

तरुणांनी मोठ्या संख्येने पोलिस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाचा पहिला श्रीगणेशा नायगाव येथे पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

शिबीर कुठे?

या शिबीरामध्ये गरीब वस्तीतील मुलांना पोलिस भरती विषयी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय मुलांना लेखी आणि शारीरिक पोलिस भरतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

यावेळी शारीरिक चाचणींसाठी नायगावच्या पोलिस मैदानात पोलिस भरतीप्रक्रियेत सहभागी झालेल्या मुलांना भरतीतील विविध इव्हेंटचा सराव करून घेतला जाणार आहे. नुकताच या भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचा श्री गणेशा मुंबई पोलिस दलातील पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी वडाळा पोलिस ठाण्यांतर्गत केला. या शिबिराला मोठ्या प्रमाणात तरुण मुलं आणि मुली उपस्थित होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या