ए भाय, जरा देख के चलो...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मस्जिद - अब्दुल मजीद हाजी मोहम्मद नाथानी चौकात सध्या खणलेला खड्डा ये जा करणाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला अाहे. या खड्ड्यात असलेल्या वायरी आणि ही चिचोंळी वाट यामुळे नक्की रहदारी कशी करावी? असा प्रश्न ये जा करणाऱ्यांना पडला आहे. या उघड्या वायरींवर एखाद्याचा पाय पडला तर शॉक लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर खुड्डा बुजवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केलीय.

हा खड्डा संबंधित फुटपाथवरील सिग्नल खांब्याला विज पुरवठा योग्य रीत्या व्हावा, यासाठी खणला गेला होता. पण दोन आठवडे उलटून सुद्धा हे काम झाले नाही आणि खड्डा ही बुजवला गेला नाही. त्यामुळे ये जा करताना नागरिकांना त्रास होत आहे. या संबंधी त्याभागातील स्थानिक वाटसरू सिद्धेश चव्हाण यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, "हे काम होऊन 5 दिवस झाले तरी येथील खड्डा बुजावला गेला नाही. त्यात या फुटपाथला लागून इमारतीमध्ये क्लासेस भरवले जातात. त्यामुळे सतत मुलं या मार्गाने ये-जा करत असतात. त्यामुळे हा मार्ग सोयीस्कर करावा."

यासंबंधी बेस्ट जनसंपर्क प्रमुख हनुमंत गोफने यांच्याशी बोलले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार देत कंत्राटदाराशी बोलण्यास सांगितले. तर कंत्राटदाराशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने यावर काहीही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींशी कुणालाच काही देणेघेणे नसल्याचं चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या