मरणानंतरही मृतदेहांना करावी लागली प्रतिक्षा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मरिन लाइन्सच्या चंदनवाडी परिसरातल्या इलेक्ट्रिक स्मशानभूमीत बुधवारी वीज गेल्याने मृतांच्या नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागली. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्या स्मशानभूमीत जनरेटरही नाही. खूप वाट पाहिल्यानंतर अखेर लाकडांचा वापर करत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

कुलाब्यातील प्रगत परिसर व्यवस्थापनसाठी (एएलएम) कार्यरत असलेल्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार स्मशानभूमीत वीज गेल्याने तिथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना कडाक्याच्या उन्हात बराच वेळ ताटकळत उभे राहावं लागलं. या स्मशानभूमीत स्वच्छतेचा देखील आभाव आहे. या परिसरात अनेक नेतेमंडळी, व्यापारी आणि कलाकार राहतात. त्यांच्या परिवारात कोणाचे निधन झाले तर, तेही अंत्यसंस्कारासाठी याच स्मशानभूमीत येतात. समजा एखादा मृतदेह त्यावेळी विद्यूतदाहिनीत असता तर काय झालं असतं, असा प्रश्नही त्या महिलेने उपस्थित केला. 

चंदनवाडी स्मशानभूमीतल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इलेक्ट्रिक ट्रांसफॉर्मर हा क्वचितच खराब होतो. येथे 24 तास वीज उपलब्ध असल्याने बॅकअप जनरेटरची सुविधा नाही. ही समस्या आम्ही मृताच्या नातेवाईकांसमोर मांडली. तसेच  दोन तासात यंत्रणा पुर्ववत होईल, असंही सांगितल्याचे तो म्हणाला.

पोपटवाडी येथील इलेक्ट्रिक सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी संध्याकाळी 4.30 वाजता बिघाड झाला होता. मात्र आम्ही 45 मिनिटात तो दुरुस्त केला आणि 5.15 वाजताच्या सुमारास परिस्थिती पुनर्संचयित केली असल्याचे बेस्टचे सहाय्यक महाव्यवस्थापक एम बी उरुणकर यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या